आता संपूर्ण देशात ‘खेला होबे’, ममता बॅनर्जी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

दिल्ली दौर्‍यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला लक्ष केलं आहे. पेगॅसस प्रकरणी ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, ‘माझा फोन हॅक करण्यात आला, अभिषेक आणि पीकेचाही (प्रशांत किशोर) फोन हॅक करण्यात आला. फ्रिडम ऑफ प्रेस आता शिल्लक राहिली नाही.’

ममता म्हणाल्या की, ‘पेगॅसस एक धोकादायक व्हायरस आहे. ज्यामुळे आपली सुरक्षा धोक्यात आली आहे. संसदेतही काम होत नाही आहे. विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. सध्या देशात आणीबाणीपेक्षाही भयावह स्थिती आहे.’  त्या म्हणाल्या की, ‘सर्व विरोधी पक्ष नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. आता संपूर्ण देशात ‘खेल होबे’ होणार आहे. आता आम्हाला सच्चे दिन हवे आहेत, खूप दिवस अच्छ दिनची वाट पाहिली.’

बुधवारी ममता बॅनर्जी यांनी  बुधवारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधीही उपस्थित होते. या भेटीनंतर ममता म्हणल्या की, भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षाने एकत्र येण्याची गरज आहे. तसेच सोनिया गांधी यांच्याशी सद्यस्थिती आणि विरोधी पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा झाली असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या