
दिल्लीत एका मौलवीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही मुलगी पाणी आणण्यासाठी मशीदीत गेली होती, तेव्हा नराधम मौलवीने तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी 48 वर्षीय मौलवीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक 17 वर्षीय मुलगी दिल्लीतील एका मशीदीत पाणी आणण्यासाठी गेली होती. तेव्हा एका मौलवीने तिच्यावर बलात्कार केला. मुलीने घरी आल्यावर आपल्या आई वडिलांना झाला प्रकार सांगितला. आई वडिलांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. मुलीला तत्काळ रुग्णालयात दाखल करत तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. वैद्यकीय चाचणीत मुलीवर बलात्कार झाल्याचे निष्पण्ण झाले.
पोलिसांनी पोक्सो अंतर्गत मौलवीविरोधात गुन्हा दाखल केला. घटनेननंतर मौलवीने दिल्लीतून पळ काढला होता. मोठ्या शिताफीने पोलिसांनी गाझियाबादमधून आरोपी मौलवीला अटक केली. आरोपीला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव मशीदीबाहेर कडक बंदोबस्त ठेवला.





























































