
राजधानी दिल्ली आणि एनसीआर परिसराला भूकंपाचे मध्यम धक्के जाणवले आहेत. तसेच जम्मू कश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्कलेवर या भूकंपाची तीव्रता 5.9 एवढी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्र अफगाणिस्तानात होता. या भूंकपामुळे कोणतीही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. याआधाही दिल्ली एनसीआर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
दिल्ली एनसीआर भाग भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. त्यामुळे या भागात अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवत असतात. आज जाणवलेल्या भूंकपाची तीव्रता जास्त असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाही देशातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. मेघालयातील नोंगपोहमध्ये या धक्क्याची नोंद 3.2 एवढी झाली होती.



























































