…अजून एक बँक गाशा गुंडाळणार

1946

जर तुमचे खाते आदित्य बिर्ला आयडीया पेमेंट्स लिमिटेड बँक (ABIPBL)मध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.  कारण आदित्य बिर्ला पेमेंट्स लिमिटेड बँक लवकरच येथून आपला गाशा गुंडाळणार आहे. विशेष म्हणजे बँक बंद करण्याचा निर्णय बँकेने स्वेच्छेने घेतला असून त्यासंदर्भात आरबीआयला बँकेने विनंती अर्जही केला आहे. तो आरबीआयने मंजूर केला आहे.

आरबीआयने एक सूचनापत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात आदित्य बिर्ला आयडीया पेमेंट्स बँक लिमिटेडच्या स्वेच्छेने बँक बंद करण्यासंदर्भातातील अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाने 8 सप्टेंबर 2019 रोजी आदेश दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने डेलॉईट ताऊचे तोमस्तु इंडीया (एलएलपी) चे ज्येष्ठ विजयकुमार वी अय्यर यांची  लिक्विडेटर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले.

यावर्षी जुलै महिन्यात आदित्य बिर्ला आयडीया पेमेंट्स लिमिटेड बँकने गाशा गुंडाळायची तयारी केली होती. ‘अव्यावहारिकपणा’ हे यामागचे कारण असल्याचे बँकेने म्हटले होते. त्यानंतर बँकेने ABIPBLच्या ऑफिशियल वेबसाईडवर www.adityabirla.bank वर बँक बंद होणार असल्याचे खातेदारकांना सूचित केले होते. तसेच बँक जरी बंद होणार असली तरी बँकेत जमा असलेली तुमची रक्कम तुम्हांला काढता येईल अशी सोय करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन, मोबाईल बँकिंग व्यवहार करावा अशी या मेसेजमध्ये विनंती करण्यात आली आहे. तसेच बँकेने अधिक माहितीसाठी 18002092265 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे खातेदारकांना आवाहन केले आहे. त्याव्यतिरिक्त [email protected] वर ईमेल करून माहिती मिळवू शकता असेही खातेदारांना सांगितले आहे.

दरम्यान, बँक बंद होण्याची ही पहिली वेळ नसून टेक महिंद्रा, चोलामंडलम इन्वेस्टमेंट अॅण्ड फायनान्स कंपनी, आयडीएफसी बँक आणि टेलीनोर फायनानशिंयल सर्विसेस यांनीही आपली पेमेंट सर्विस बंद केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या