
दिल्लीच्या येथील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासात गुरुवारी एक मोठी माहहती समोर आली आहे. ‘दैनिक भास्कर’ने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, बाबरी मशीद पाडल्याच्या दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी दिल्लीसह अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता.
यासाठी त्यांनी ३२ कार्सची व्यवस्था केली होती. ज्या स्फोटकांनी भरून ३२ ठिकाणी स्फोट घडवण्याचा कट होता. यामध्ये ब्रेझा, स्विफ्ट डिझायर, इकोस्पोर्ट आणि आय२० सारख्या कार्सचा समावेश होता. यातच केंद्रीय तपास यंत्रणांनी आतापर्यंत चार गाड्या जप्त केल्या आहेत.
१० नोव्हेंबर रोजी झालेला आय२० कारचा स्फोट या मालिकेतील सूड उगवण्याच्या हल्ल्याचा एक भाग होता. या स्फोटात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २० जण जखमी झाले आहेत, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.




























































