सरन्यायाधीशांचे कार्यालय ‘आरटीआय’च्या कक्षेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे कार्यालयही माहिती अधिकार कक्षेत आले आहे. यासंबंधीचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने बुधवारी घेतला. यामुळे न्यायालयीन कामकाज अधिक लोकाभिमुख होणार आहे. पारदर्शकतेने कारभार करताना न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित राहील. माहिती अधिकार कायद्याचा (आरटीआय) वापर ‘वॉच’ ठेवण्यासाठी केला जाणार नाही, असेही न्यायालयाने बजावले.

दिल्ली उच्च न्यायालयाने 2010 मध्ये सर्वोच्च न्यायालय हे माहिती अधिकारी कक्षेत आणण्याबाबतचा निर्णय दिला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाचे सेक्रेटरी जनरल आणि मुख्य माहिती अधिकाऱयांनी अव्हान दिले होते. या याचिका आज न्यायालयाच्या घटनापीठाने फेटाळल्या आणि सरन्यायाधीशांच्या कार्यालयालाही ‘आरटीआय’ कायदा लागू होणार असे स्पष्ट केले.

न्यायमूर्तींच्या संपत्तीची माहिती ‘आरटीआय’ कक्षेबाहेर

कॉलेजियमद्वारे सुचवण्यात आलेल्या न्यायमूर्तींची नावे सार्वजनिक करता येतील, मात्र ज्यांची न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती होणार नाही त्यामागची कारणे दिली जाणार नाहीत. तसेच न्यायमूर्तींची संपत्ती उघड करण्याचा मुद्दा
‘आरटीआय’ कक्षेबाहेर राहणार आहे.

न्यायालयाने काय म्हटले…

  • सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती दीपक आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या घटपापीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सरन्यायाधीश गोगोई, न्या. गुप्ता आणि न्या. खन्ना यांनी एकत्रित निकालपत्र लिहिले. न्या. रामन्ना आणि न्या. चंद्रचूड यांनी स्वतंत्र निकालपत्र लिहिले.
  • राइट टू प्रायव्हसी आणि पारदर्शकता याचा समतोल पाहून सरन्यायाधीशांच्या कार्यालयातून माहिती दिली जाईल, असे सरन्यायाधीश गोगोई म्हणाले.
  • न्यायमूर्ती हे घटनात्मक पद आहे. न्यायव्यवस्थेला पूर्णपणे अलिप्त राहून काम करता येणार नाही असे न्या. चंद्रचूड यांनी सांगितले.
  • न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य आणि पारदर्शक कारभार हे दोन्ही एकत्रितपणे समोर यायला हवे, असे न्या. खन्ना म्हणाले.
  • राइट टू प्रायव्हसी, पारदर्शकता आणि न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र याचा समतोल साधला जाईल, असे न्या. रामण्णा यांनी सांगितले.