दिल्लीत टिकटॉक स्टार तरुणीची आत्महत्या, कारण अस्पष्ट

1428

दिल्लीमध्ये एका टिकटॉक स्टारने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. टिकटॉक बॅन झाल्यानंतर ही तरुणी अस्वस्थ होती अशी माहिती समोर आली आहे.

संध्या चौहान ही तरुणी दिल्लीच्या ग्रीन पार्कमध्ये राहत होती. ती टिकटॉक स्टार होती, तिचे खूप फॉलोअर्सही होते. शुक्रवारी तिने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. हिंदुस्थान चीन संघर्षाच्या पार्श्वभुमीवर हिंदुस्थान सरकारने टिकटॉकसह 59 ऍप्स बॅन केले होते. तेव्हापासून संध्या अस्वस्थ होती. तसेच संध्याच्या घरी वाद सुरू होते. त्यामुळेही संध्या बैचेन होती.  असे असले तरी संध्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या