दिल्लीत भीती आणि तणाव,भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करा न्यायालयाने फटकारले

614

नागरिकत्व सुधारित कायद्यावरून (सीएए) आगडोंब उसळलेल्या दिल्लीत चौथ्या दिवशीही तणाव आणि भीतीचे वातावरण कायम आहे. दंगलग्रस्त भागात चार ठिकाणी संचारबंदी लागू आहे. मृतांची संख्या 27 वर गेली असून, गुप्तचर यंत्रणा ‘आयबी’च्या अधिकाऱ्याचा मृतदेह नाल्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे. देशाच्या राजधानीत एवढा हिंसाचार कसा झाला? 1984च्या हिंसाचाराची पुनरावृत्ती नको असे फटकारतानाच चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल करा, असे आदेशच उच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, हिंसाचारास केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या