अभिनंदनचा व्हिडीओ गेम गुगलकडून नामांकित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी आपल्या हेलिकॉप्टरद्वारे शत्रूला सळो की पळो करून सोडले होते. त्याच धर्तीवर हवाई दलाने आणलेल्या ‘इंडियन एअर फोर्स ः अ कट अबोव्ह’ या व्हिडीओ गेमला सर्वसामान्य नेटकऱयांकडून पसंती मिळत असतानाच गुगलनेही हा गेम ‘सर्वोत्कृष्ट गेम’ कॅटेगरीमध्ये नामांकित केला आहे.

गेमच्या या यशामुळे हिंदुस्थानी हवाई दल खूश झाले असून त्यांनी यूजर्सना या थ्रीडी गेमसाठी व्होट करण्याचे आवाहन आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर केले आहे. यूजर्सने या गेमला मत दिले तरच हा गेम ‘यूजर्स चॉईस गेम कॅटेगरीमध्ये यशस्वी ठरू शकणार आहे. याच वर्षी 31 जुलै रोजी हा गेम लाँच करण्यात आला होता. तरुणांमध्ये इंडियन हवाई दलाबाबत आकर्षण निर्माण व्हावे यासोबतच त्यांच्यात देशसेवेची भावना जागृत व्हावी यासाठी माजी एअरचीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी हा गेम लाँच केला होता.

अफलातून गेमिंग अनुभव…

हवाई दलाचा अनुभव देणारा हा ऑनलाइन मल्टीप्लेयर बॅटल गेम आहे. यात खेळाडूंना हिंदुस्थानी हवाई दलाला करावी लागणारी मिशन्स पार पाडावी लागतात. यामुळे यूजर्सना आपण एक पूर्ण वैमानिक असल्याचा अनुभव येतो. खेळाच्या सुरुवातीला या गेममधील सुविधा, हत्यारांचा वापर आणि युद्धनीती याबाबत प्रशिक्षण दिले जाते.