डिलिव्हरी बॉय करायचा चोऱया 

खाद्यपदार्थ डिलिव्हरी करण्याच्या नावाखाली मोबाईल आणि सोनसाखळी चोऱया करणाऱया डिलिव्हरी बॉयला अखेर टिळक नगर पोलिसांनी अटक केली. नदीम नसीम अख्तर खान असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेने तीन गुह्यांची उकल करण्यात टिळकनगर पोलिसांना यश आले आहे.

तक्रारदार महिला या व्यावसायिक असून छत्तीसगडच्या रहिवासी आहेत. तीन दिवसांपूर्वी त्या घाटकोपर पूर्व परिसरातून जात होत्या. तेव्हा मोटरसायकलवरून आलेल्या एकाने त्यांचा मोबाईल खेचून पळ काढला. घडल्याप्रकरणी महिलेने टिळक नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक सुनील काळे यांच्या पथकातील सहायक निरीक्षक राहुल वाघमारे, महिला उप निरीक्षक पौर्णिमा हांडे, शिंदे, साटेलकर, रोंगटे आदीच्या पथकाने तपास सुरू केला.

पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा नदीमने गोवंडी येथील हॉटेलमधून पार्सल घेतल्याचे एका फुटेजमध्ये दिसले. तोच धागा पकडून पोलिसांनी तपास पुढे नेला. पोलिसांनी त्या हॉटेल आणि डिलिव्हरी पंपनीत जाऊन चौकशी केली.