
हिंदुस्थानात AI च्या वाढत्या वापरामुळे आॅनलाईन जाॅब पोर्टल्सवर एआय इंजिनिअर्सची मागणी सातत्याने वाढत आहे. AI इंजिनिअर या जाॅब अंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजेंस सिस्टम डिझाइन करण्याचे काम करता येते. तसेच इतरही अनेक तांत्रिक बाबी या एआय इंजिनिअर्स मार्फत हाताळल्या जातात.
कंपन्यांमध्ये AI अभियंते विविध साधनांचा वापर करून डेटा गोळा करतात आणि नंतर त्यातून निष्कर्ष काढतात. याव्यतिरिक्त, त्यांचे काम मशीन लर्निंग मॉडेल तयार करणे आणि प्रशिक्षित करणे आहे. ते एआय सिस्टमला अॅप्स/वेबसाइट्स/सर्व्हरमध्ये एकत्रित करतात, एआय वापरून विविध कंपनी ऑपरेशन्स सुलभ करतात.
AI इंजिनिअर्सची मागणी केवळ आयटी क्षेत्रापुरती मर्यादित नाही. या व्यक्तींना आरोग्यसेवा, बँकिंग/वित्त, ई-कॉमर्स, ऑटोमोबाईल आणि सायबरसुरक्षा क्षेत्रात भरती केले जात आहे, ज्यामुळे हे एक व्यवहार्य करिअरचा पर्याय बनलेला आहे. या पदासाठी मोठ्या पॅकेजेससह नियुक्ती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.
Linkedin वर नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे की, 2026 मध्ये 72 टक्के उमेदवार हे एआय संबंधित जाॅब सर्च करत आहेत. सध्याच्या घडीला हिंदुस्थानातील 94 टक्के लोक हे नोकरी शोधण्यासाठी AI चा वापर प्रामुख्याने करत आहेत. AI इंजिनिअर्स पदांसाठी दरवर्षी ₹१ कोटी पर्यंतचे पॅकेजेस उपलब्ध आहेत. हिंदुस्थानात ११ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंतच्या पॅकेजेससह या पदांसाठी अनेकांना नियुक्त केले जात आहे.





























































