
देशभरात इलेक्ट्रिक कारची मागणी वार्षिक आधारावर 93.21 टक्के वाढली आहे. जुलै 2025 मध्ये विक्री झालेल्या कारची संख्या 15,528 पर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये केवळ 8037 कारची विक्री झाली होती. या विक्रीत सर्वात जास्त टाटा मोटर्सचे योगदान आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा) ने ही आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, टाटाने जुलैमध्ये 6047 कारची विक्री केली. एमजी मोटर्स 5089 कारची विक्री केली. दुचाकी वाहनांच्या विक्रीत 4.35 टक्के घसरण झाली आहे. जुलैमध्ये 1,02,973 वाहनांची विक्री झाली. जुलै 2024 मध्ये एकूण 1,07,655 ई-दुचाकीची विक्री झाली होती.