शरीरसुखाची मागणी हीसुद्धा ‘लाचखोरी’च!

18

सामना प्रतिनिधी, नवी दिल्ली

शरीरसुखाची मागणी करणे ही नव्या भ्रष्टाचारविरोधी कायद्यानुसार ‘लाचखोरी’च ठरणार असून त्यासाठी सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. केंद्र सरकारमधील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. भ्रष्टाचारविरोधी कायद्यात यंदा नवी दुरुस्ती करण्यात आली आहे. त्याद्वारे ‘लाचखोरी’ या संज्ञेची व्याप्ती वाढवणाऱ्या ‘गैरफायदा’ या व्यापक शब्दाचा समावेश त्या कायद्यात करण्यात आला आहे.

या दुरुस्तीमुळे लाचखोरीची व्याप्ती कायदेशीर मोबदल्यापेक्षा अधिक लाभ वसूल करण्यापलीकडे गेली आहे. एखादे काम करून देण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणे, महागडी क्लब मेंबरशिप स्वीकारणे, भेटी, मोफत विमान प्रवासाची तिकिटे, हॉटेलांमधील वास्तव्य, मित्र वा नातेवाईकांची एखाद्या ठिकाणी वर्णी लावणे असे सारे प्रकार ‘लाचखोरी’चा गुन्हा ठरणार आहेत.

द्रव्य लोभापेक्षाही शरीरसुखाची मागणी करण्याचा प्रकार अधिक गंभीर मानला गेला आहे, असे भ्रष्टाचारविरोधी कायद्यातील नव्या दुरुस्तीवर बोलताना सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील जी. वेंकटेश राव यांनी सांगितले. भ्रष्टाचारविरोधी कायद्यातील नव्या दुरुस्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिल्यानंतर त्याबाबतची अधिसूचना जुलै महिन्यात काढण्यात आली आहे.

summary- demand for physical favors will in bribing section

आपली प्रतिक्रिया द्या