साताऱ्यात डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले; रक्ताचा तुटवडा, प्लेटलेट्सची मागणी वाढली

जिह्यात डेंग्यू, चिकुनगुनिया या आजारांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस काढत असतानाच, आता शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने ‘प्लेटलेट्स’ची मागणीदेखील काढली आहे. परिणामी रक्त आणि प्लेटलेट्स मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत असल्याची स्थिती आहे.

सातारा जिह्यात 2 शासकीय आणि 8 खासगी अशा 10 रक्तपेढ्या आहेत. एका पिढीत सर्वसाधारण दिवसाला 15 ते 20 रक्त पिशव्यांची मागणी असते. जिह्याला दररोज 200 पिशव्यांच्या रक्तसंकलनाची मागणी असते. मात्र ती काढली असून, दुप्पट झाली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली असून, रक्त आणि प्लेटलेट्सच्या मागणीत 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचे विविध रक्तपेढी संचालकांनी सांगितले. सध्या सर्वाधिक तुटवडा ‘बी’ आणि ‘ए’ पॉझिटिक्ह रक्तगटाचा आहे. रक्तपेढीत ‘बी’ पॉझिटिव्ह रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांना ‘बी’ पॉझिटिव्ह रक्तगटाचे रक्त बाहेरून आणावे लागले आहे. अशीच स्थिती शहरातील खासगी रक्तपेढ्यांची झाल्याने रक्तदान करण्याचे आवाहन रक्तपेढ्यांनी केले आहे. सध्या सर्वच रक्तगटांचा तुटवडा जाणवत आहे. डेंगूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने प्लेटलेट्सची सर्वाधिक मागणी होत आहे. मागणी जास्त आणि साठा कमी असल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. ‘ओ’ आणि ‘एबी’ पॉझिटिव्ह या रक्तगटाचे रक्त उपलब्ध आहे. मात्र, ‘ए’ आणि ‘बी’ पॉझिटिव्ह रक्तगटाचा तुटवडा जाणवत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. डेंग्यूच्या काही रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे दिसतात. रक्त आणि प्लेटलेट्सची मागणी काढली आहे. सध्या ‘ए’ आणि ‘बी’ या रक्तगटाचा तुटवडा जाणवत आहे. पावसाळ्यामुळे शिबिरांची संख्या घटल्याने तुटवडा जाणवत आहे. गंभीर स्थिती निर्माण होऊ नये म्हणून शिबिर आयोजित करण्याचे आवाहन केले जात आहे.

प्लेटलेट्सचे आयुष्य कमी

डेंग्यू झाल्यावर रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. काही रुग्णांना दोन, तर काही रुग्णांना त्यापेक्षा जास्त प्लेटलेट्स द्याव्या लागतात. एका रक्तदात्याच्या रक्तातून 50 ते 60 मिलिलिटर ‘डोनर प्लेटलेट्स’ मिळतात. प्लेटलेट्सचा साठा पाच दिवसच करता येतो. त्यामुळे प्लेटलेट्स जास्त प्रमाणात साठवून ठेवता येत नाहीत, असे रक्तपेढी संचालकांनी सांगितले.