
डेन्मार्क ओपन 2025 च्या पुरुष दुहेरी उपांत्य फेरीत हिंदुस्थानच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. अटीतटीच्या लढतीत जपानची तापुरो होकी आणि युगो कोबायाशी यांची जोडी सात्त्विक-चिरागला भारी पडली आणि 23-21, 18-21, 21-16 असा पराभव स्वीकारावा लागला. सात्त्विक-चिराग जोडीच्या पराभवामुळे हिंदुस्थानचा डेन्मार्क ओपन 2025 मधील प्रवास संपुष्टात आला आहे. 68 मिनिटे चाललेल्या या चुरशीच्या लढतीत दोन्ही बाजूंनी उत्पृष्ट खेळ पाहायला मिळाला, मात्र निर्णायक वेळी जपानी जोडीने वर्चस्व राखले. तापुरो आणि कोबाया या जपानी जोडीने 2021 मध्ये विश्वविजेतेपद तर 2019 मध्ये त्यांनी रौप्य पदकही पटकावले आहे.