
उदगीर येथील डेपो अधिक्षकाने बिअरची रिकामी बाटली वाहकाचे डोक्यात फोडल्याची घटना घडली आहे. ड्युटी देण्याच्या कारणावरुन ही मारहाण करण्यात आली असून या प्रकरणी डेपो अधिक्षकाविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहक असणारे धर्मा तातेराव गायकवाड रा. संजय नगर उदगीर यांनी याबद्दल तक्रार दाखल केली आहे. त्यात ७ ऑक्टोंबर रोजी नवरात्रीनिमित्त उदगीर आगारात डेपोमधील कर्मचाऱ्यांनी जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. दुपारी १२ च्या सुमारास डेपो अधिक्षक बाबुराव दिंडे हे तिथे आले असता फिर्यादीने मला ड्युटी रोटेशनमध्ये टाका, जाणिवपुर्वक त्रास देऊ नका असे म्हटले. तेंव्हा त्यांनी बाहेर जाऊया असे सांगत त्यांना बाहेर नेले. त्यावेळी त्यांच्या सोबत ज्ञानोबा पाटील, विक्रम वायचाळकर हे होते. गोपाळ बारमध्ये जावून दारु पिल्यानंतर बारच्या बाहेर आल्यावर पुन्हा त्यांच्यासोबत बाचाबाची झाली. त्यांच्या हातात असलेल्या रिकामी बिअरची बाटली त्यांनी धर्मा गायकवाड यांच्या डोक्यात फोडली. त्यानंतर ज्ञानोबा पाटील व विक्रम वायचाळकर यांनी फिर्यादीला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी पोलसांनी डेपो अधिक्षक बाबुराव शिंदडे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.






























































