
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरे गावातील जागृत देवस्थान श्री देव रामेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासंबंधी मुंबईत राहणाऱ्या आचरेवासीयांची बैठक उद्या, 19 मार्च रोजी सकाळी 11 वाजता दादर पश्चिम येथील शारदाश्रम विद्यामंदिर हॉल येथे होणार आहे. या सभेला मुंबईस्थित आचरेवासीयांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे यांनी केले आहे.
आचरे हे गाव इसवी सन 12 व्या शतकापूर्वीपासून अस्तित्वात आहे. या गावात लाकडी नक्षीकामाने नटलेले इनामदार श्री देव रामेश्वरांचे भव्य मंदिर सुमारे 800 ते 1000 वर्षांपासून आहे. मंदिराचे लाकडी बांधकाम आजही दिमाखात उभे असून मंदिराचे मूळ बांधकाम कायम ठेवून जीर्णोद्धार करण्यासाठी इनामदार श्री देव रामेश्वरांचा हुकूम झालेला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक उपक्रमासाठी आचरे गावातील ग्रामस्थ आणि बारापाच मानकरी यांच्याबरोबर देवस्थान ट्रस्टशी प्राथमिक चर्चा झाली आहे.
त्यामुळे आता मुंबईत राहणाऱ्या आचरेवासीयांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईकर आचरेवासीयांनी या बैठकीला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे, अध्यक्ष मिलिंद प्रभूमिराशी (9833045344) आणि सचिव अशोक पाडावे (9869280529) यांनी केले आहे.





























































