तो अहवाल सीताराम कुंटे यांचा नाही; देवेंद्र फडणवीस यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
devendra-fadnavis

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जो अहवाल दिला आहे तो त्यांनी तयारच केलेला नाही. हा अहवाल कदाचित मंत्र्यांनी तयार केला असावा आणि त्यावर मुख्य सचिवांनी स्वाक्षरी केली असावी, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

फोन टॅपिंगच्या संदर्भात मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर केला. या अहवालात तत्कालीन गुप्तवार्ता आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी सीताराम कुंटे यांना ओळखतो. ते सरळमार्गी आहेत. हा अहवाल कदाचित गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड किंवा कौशल्य विकासमंत्री नबाव मलिक यांनी तयार केला असावा आणि त्यावर मुख्य सचिवांनी सही केली असावी.

माझे फक्त कव्हरिंग लेटर

हा गोपनीय अहवाल जाहीर करण्याचा आरोप माझ्यावर करण्यात आला. त्यामुळे अनेक अधिकाऱयांनी मानसिक ताण सहन करावा लागला असेही सांगितले गेले, पण मी तर फक्त कव्हरिंग लेटर दिले होते असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.