
राज्यातील काही भागांत 12 तारखेला हिंसा भडकली. त्याची रिअॅक्शन 13 तारखेला उमटली. पण 12 तारखेची घटना डिलीट करून 13 तारखेच्या घटनेवर अधिक जोर दिला जात आहे. 12 तारखेच्या घटनेवर का बोललं जात नाही? या हिंसेमागे कोण होतं? अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर त्यावर गप्प का आहेत, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.
अमरावती दौऱयावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आज तेथील हिंसाचाराचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, 12 तारखेची घटना डिलीट करून सर्व कारवाई 13 तारखेच्या घटनेवर सुरू आहे. 12च्या घटनेवर काहीच कारवाई नाही. त्यावर कोणताही नेता बोलत नाही. विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट करणं आम्हाला मान्य नाही. पण चुकीच्या घटनेचे लांगूलचालन होत असेल तर आम्हाला मान्य नाही. असे सांगतानाच 12 तारखेच्या घटनेवर सत्ताधाऱयांनी चिडीचूप भूमिका घेतली आहे. त्याचं कारण काय? मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न तर नाही ना, ही शंका वाटते.
हिंदुत्ववादी म्हणून टार्गेट
13 तारखेच्या घटनेला जे जबाबदार नाहीत, पण ते हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत म्हणून टार्गेट केलं जातं आहे, हा आमचा आरोप आहे. राजकीय दबावाखाली पोलीस एकतर्फी कारवाई करीत असतील तर आम्हाला निषेध करावा लागेल. नाहीतर जेलभरो आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.
फेक न्यूजच्या आधारे मोर्चे काढले
जी घटना घडली नाही त्यावर मोर्चा काढण्यात आला. कुराण शरीफ जाळण्यात येत असल्याचा व्हिडीओ दाखवण्यात आला. पण तो व्हिडीओ दिल्लीच्या पॅम्पमधील होता. पाकिस्तानातील पह्टो व्हायरल केले गेले. फेक न्यूजच्या आधारे मोर्चे कोणी काढले? त्याची चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली.



























































