2024 च्या निवडणुका स्वबळावर जिंकणार – देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेले यश ही तर विजयाची सुरुवात आहे. आगामी महापालिका निवडणुकीसह 2024 मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणूक भाजप स्वबळावर जिंकेल, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची प्रकृती बरी नसतानाही त्यांनी मुंबईत येऊन मतदान केले. त्यामुळे भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाला. त्यामुळे हा विजय त्यांना समर्पित करीत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.