फडणवीस दिल्लीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री शिंदे आजारी पडलेले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. या अचानक झालेल्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

फडणवीस दुपारीच दिल्लीला रवाना झाले. या दौऱ्यात ते भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येते.

सुप्रीम कोर्टात सुरू असलेली शिवसेना विरुद्ध शिंदे गटाची सुनावणी आणि संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार यावर या बैठकीत चर्चा होण्याचे संकेत आहेत. न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तर भाजपसमोर काय पर्याय आहेत यासंदर्भातील चर्चाही होईल, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.