‘नमो’ नावाने सुरू केलेल्या दहा योजना बंद, फडणवीसांचा शिंदेंना धक्का

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खूश करण्यासाठी ‘नमो’ नावाने सुरू केलेल्या दहा योजना फडणवीस यांनी बंद केल्या आहेत. तिजोरीतील खडखडाटामुळे अनेक योजना गुंडाळल्या जात असल्या तरी मोदींच्या नावाच्या योजना बंद करण्याचे धाडस म्हणजे शिंदेंना निकामी करण्याची फडणवीसांची खेळी असल्याचे म्हटले जात आहे.

शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे यांनी या दहा योजना जाहीर केल्या होत्या. शिंदे गटाला ‘महाशक्ती’ने बहुधा दैवत व देवघर बदलण्याच्याच अटींवर चिन्ह आणि नाव दिले होते, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे.

बंद केलेल्या योजना

z नमो महिला सशक्तीकरण योजना

z नमो कामगार कल्याण योजना

z नमो शेततळे अभियान

z नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान योजना

z नमो ग्राम सचिवालय योजना

z नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना

z नमो दिव्यांग शक्ती योजना

z नमो क्रीडा मैदान व उद्यान योजना

z नमो शहर सौंदर्यीकरण योजना

z नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना