सरकार पाडण्यात स्वारस्य नाही; आधी चालवून दाखवा!

devendra-fadnavis

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार पाडून दाखवा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत असले तरी सरकार पाडणे सोडून द्या, आधी सरकार चालवून दाखवा, तुमचे महाविकास आघाडीचे सरकार अंतर्किरोधाने भरलेले आहे की आम्हाला पाडायची आवश्यकता नाही, अशी दर्पेक्ती विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली.

भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत देवेंद्र फडणकीस बोलत होते. दै. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार पाडून दाखवा, असे आव्हान दिले होते. त्याचा उल्लेख करीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला सरकार पाडण्यात स्वारस्य नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार पाडून दाखवा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार सांगत असले तरी आधी सरकार चालवून दाखवा, असे माझे तुम्हाला आव्हान आहे. आम्हाला सरकार पाडायची गरज नाही. एकमेकांच्या तंगडय़ा तोडायला तुम्हीच सज्ज व्हाल आणि तेच तुम्ही रोज करतात. अंतर्विरोधानेच एक दिवस तुमचे सरकार कोसळणार आहे. आम्ही तोपर्यंत वाट बघायला तयार आहोत. त्यानंतर महाराष्ट्राचे भवितव्य काय आहे हे आम्ही निश्चितपणे ठरवा असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. सरकार तीन चाकी पण स्टिअरिंग माझ्याच हातात असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले होते. त्या संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ऑाॊटो रिक्षाचे स्टिअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात हातात आहे. पण रिक्षा कुठे जाईल हे चालक ठरवत नाही. तर त्यामध्ये बसलेले प्रवासी ठरकतात हे मुख्यमंत्री विसरले, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या बैठकीत आमदार आशिष शेलार, प्रविण दरेकर, मंगलप्रभात लोढा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व नवी दिल्लीतून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व्हिडिओ काँन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता

महाराष्ट्रात भाजपची स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कटिबध्द व्हावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष जे पी. नड्डा यांनी केले. यापुढे कोणाचीही मदत न घेता महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत येण्यासाठी आतापासून तयारीला लागा असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या