फडणवीसांची ‘उत्तर’ भारतीय सभा; तेच ते आणि तेच ते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘उत्तर’ सभा घेणार अशी गर्जना करणाऱया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज गोरेगाव येथे उत्तर भारतीय सभा घेतली. या सभेत त्यांनी तेच ते आणि तेच ते मुद्दे मांडत बाबरी मशीद मीच पाडल्याचा पुनरुच्चार केला.

भाजपतर्फे नेस्को संकुलात हिंदी भाषिक संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. फडणवीस यांनी या सभेला ‘उत्तर’ सभा संबोधून उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मी बाबरी पाडण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी मला अटक झाली होती. मी तुरुंगात होतो हे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. लाठी गोली खायेंगे, मंदिर वहीं बनाएंगे असे म्हणत म्हणत मी अयोध्येला गेलो होतो, असेही ते म्हणाले.

फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर टीका केली, पण महागाईवर एक चकार शब्दही काढला नाही. कविता आणि शेरोशायरी करून त्यांनी हुकमी टाळय़ा मिळविल्या एवढेच. मंदिरात, फुटपाथवर झोपलो. अयोध्येला जाताना तिकीट काढायलाही खिशात पैसे नव्हते, असे म्हणत त्यांनी बाबरीचा प्रवास सांगितला.