देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
devendra-fadnavis

शनिवारी पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना सोबत घेऊन गुपचूप शपथ घेतली. त्यानंतर मोठं राजकारणाने मोठं वळण घेतलं. त्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आणि सहयोगी पक्ष, अपक्षांनी एकत्र येऊन आपल्याकडे बहुमत असल्याचं ठामपणे सांगितलं आणि त्यासाठी न्यायालयीन लढाई देखील जिंकली. त्यानंतर आज अजित पवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने बहुमताची शक्यता संपुष्टात आली आहे, त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे. पत्रकार परिषदेनंतर राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करण्यार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.