2019 नंतरही मीच मुख्यमंत्री!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, लातूर

2019 च्या आगामी विधानसभा निवडणुकीनंतरही मीच मुख्यमंत्री असेन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ‘अटल महाआरोग्य शिबिरा’च्या उद्घाटनप्रसंगी लातूर येथे ते बोलत होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीकरण आणि सेवासुविधांसाठी तीन टप्प्यांत 100 कोटींचा निधी देण्यात येईल. यातील पहिल्या टप्प्यातील निधी लगेच, दुसऱ्या टप्प्यातील निधी पुढील वर्षात आणि तिसरा टप्पादेखील माझ्याच कार्यकाळात मिळेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

summary- devendra fadnavis speaks about his cm post after 2019