
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
गुरूवार सकाळपासून मुख्यमंत्री देवन्द्र फडणवीस यांची प्रकृती अस्वस्थ होती, परंतु सिंदखेडराजा माँ जिजाऊंच्या जन्मस्थळ विकास आराखड्याचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी प्रकृती अस्वस्थ असताना देखील ते सिंदखेडराजा येथे आले. त्यांनी १५ मिनिटे भाषणही केले. परंतु पुन्हा चक्कर येत अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांनी वाशिम दौरा रद्द करुन त्यांनी हेलीकॉप्टरने संभाजीनगर गाठले. संभाजीनगर येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती चांगली असून उपचारही सुरु आहे.

























































