देवगड बंदरात 400 हून अधिक नौका आश्रयाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवामान विभागाने 3 ऑक्टोबरपर्यंत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे देवगड बंदरामध्ये सुमारे 400 हून अधिक नौका सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. यामध्ये गुजरात मधील 180 नौका तर तामिळनाडू मधील पाच नौकांचा समावेश आहे. हवामान विभागाने 3 ऑक्टोबर पर्यंत ताशी 45 ते 65 किलोमीटर वेगाने वारे तसंच अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

समुद्रात वादळ सदृश्य स्थिती असल्यामुळे मच्छिमारीसाठी गेलेल्या नौका सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. स्थानिक नौकांबरोबर मालवण, नाटे, गुजरात तसेच तामिळनाडू राज्यातील नौका बंदरात दाखल झाले आहेत. सुमारे 400 हून अधिक नौका देवगड बंदरात दाखल झाल्याने देवगड बंदर गजबजून गेले आहे. तीन ऑक्टोबर पर्यंत वादळी वातावरणाचा इशारा दिल्यामुळे वातावरण पूर्वपदावर आल्यानंतर नौका मच्छिमारीसाठी समुद्रात जाणार आहेत.