रहस्यभेद होणार , देविंदर सिंहला 15 दिवसांचा रिमांड

532

कश्मीर खोऱ्यातील धाडीत हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांसोबत पकडला गेलेला माजी उप पोलीस अधीक्षक देविंदर सिंहसह तिघांना एनआयए न्यायालयाने 15 दिवसांचा रिमांड दिला आहे.या काळात गुप्तचर अधिकाऱ्यांकडून देविंदर याची कसून चौकशी होणार असल्याने त्याच्या भूमिकेबाबत रहस्यभेद होणार आहे. 11 जानेवारीला हिजबुलच्या टोळीसोबत अटक झालेल्या देविंदरची त्याच्या पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे.

श्रीनगरचा माजी उप पोलीस अधीक्षक देविंदर याच्यावर लाखो रुपयांची लाच घेऊन हिजबुलच्या दहशतवाद्यांना स्फोटकांसह दिल्लीला जाण्यासाठी मदत करण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. कारण जम्मू पोलिसांनी देविंदरसह चौघांना स्फोटके आणि शस्त्रे भरलेल्या कारसह ताब्यात घेतले होते. त्यानंतर एनआयएने देविंदरच्या श्रीनगरमधील निवासस्थानी घातलेल्या छाप्यात 7.5 लाख रुपये ,संशयित नकाशे आणि काही संवेदनशील कागदपत्रे हस्तगत केली होती. 2001 च्या संसद हल्ल्यात देविंदरचा हात आहे का? याचाही तपास एनआयए करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या