
मराठी रंगभूमीवर काही दिवसांपूर्वी दाखल झालेल्या ‘देवमाणूस’ नाटकाचे प्रेक्षक, समीक्षक यांच्याकडून कौतुक होत आहे. आंतरराष्ट्रीय विषयावरील नाटक लक्षवेधी ठरत आहे. या आधी भद्रकाली प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या ‘संगीत देवबाभळी’ नाटकातून प्राजक्त देशमुख (लेखक-दिग्दर्शक), आनंद ओक (संगीत दिग्दर्शक), प्रफुल्ल दीक्षित (प्रकाशयोजनाकार) आणि शुभांगी सदावर्ते (अभिनेत्री) यांचे व्यावसायिक मराठी रंगभूमीवर पदार्पण झाले. त्याचप्रमाणे ‘देवमाणूस’ या नाटकातून शंतनू चंद्रात्रे (लेखक), जयेश आपटे (दिग्दर्शक), शुभम जोशी, सायली सावरकर (संगीत), अपूर्वा शौचे (वेशभूषा) तसेच कलाकार श्रीपाद देशपांडे, प्रणव प्रभाकर, दुर्गेश बुधकर, आशिष चंद्रचूड, शर्वरी पेठकर, ऋतुजा पाठक यांचे देखील व्यावसायिक मराठी रंगभूमीवर पदार्पण झाले. नाटकाने 25 प्रयोगांचा टप्पा पार केला आहे.




























































