पहिल्या पाच कसोटींत 50 प्लस धावा, डेवोन कॉनवेचा पदार्पणीय धमाका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यूझीलंड संघाकडून आपले कसोटी पदार्पण सार्थ ठरवत 30 वर्षीय डावखुऱ्या डेवोन कॉनवेने सलग पाच कसोटी सामन्यांत 50 हून अधिक धावा नोंदवणारा जगातील पहिला फलंदाज  म्हणून आपल्या नावाची नोंद कसोटी क्रिकेटमध्ये केली आहे. बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका कॉनवेसाठी विक्रमी ठरली आहे. कारण त्याने पदार्पणात आपल्या पहिल्या चार कसोटींत दोन शतके आणि दोन अर्धशतके रचण्याचा भीमपराक्रम साकारला आहे. बांगलादेशविरुद्धच्या ख्राईस्टचर्चच्या दुसऱ्या कसोटीत तो 99 धावांवर असून आपल्या तिसऱ्या कसोटी शतकापासून केवळ एका धावेने दूर आहे.

कॉनवेच्या पहिल्या 5 कसोटींत 613 धावा

न्यूझीलंडसाठी ‘रनमशीन’चे काम करणाऱ्या 30 वर्षीय कॉनवेने आपल्या कारकीर्दीतील पहिल्या 5 कसोटी क्रिकेट लढतींत 76 च्या शानदार सरासरीने आतापर्यंत 613 धावांचा पाऊस पडला आहे. आता सुरू असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत कॉनवेने कर्णधार टॉम लॅथम (नाबाद 186) याच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 201 धावांची अभिजित भागीदारी रचली आहे. .

कॉनवे 99 धावा करून आपल्या तिसऱ्या कसोटी शतकापासून केवळ एका धावेने दूर आहे. या दोघांच्या धडाक्यामुळे न्यूझीलंड संघाने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी आपल्या पहिल्या डावात 1 बाद 349 असा धावांचा डोंगर उभा केला आहे.