
गणेशोत्सव नुकताच संपन्न झाला. गणेशोत्सवातील अनेक सुंदर, भक्तीमय व्हिडीओ अजूनही व्हायरल होत आहेत. असाच एका शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या डान्सचा हा सुंदर व्हिडीओ व्हायरल होत आहे. बाप्पाची मूर्ती मधोमध ठेवण्यात आली असून बाजूने शिक्षक आपल्या विद्यार्थिनींसह ‘जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर’ या बाप्पाच्या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या डान्सचे नेटीजन्सकडून चांगलेच कौतुक होत आहे. हल्ली मुलांच्या कलाने शिकवण्याकडे शिक्षकांचा कल असतो. मुलांचे छंद, कला, आवड-निवड या सर्व गोष्टींकडेही लक्ष दिले जाते. अनेकदा शिक्षकही वर्गातील विद्यार्थ्यांबरोबर नाचताना, गाणी गाताना दिसतात. हा व्हिडीओ त्याचेच प्रतीक आहे.