
1984 मध्ये महादेवराव दातार यांनी दुबईत जाऊन भाडय़ाच्या जागेत एक छोटेसे किराणा मालाचे दुकान थाटले होते. दुबईतील हिंदुस्थानींच्या जिभेवर चव रेंगाळावी यासाठी दातार तेव्हा हिंदुस्थानातून खास ‘मराठी’ मसाला घेऊन गेले होते. दातारांचा मसाला झणझणीत ठरला. आज त्यांच्या मुलाने डॉ. धनंजय यांनी दुबईत मसाल्याचे पन्नासावे सुपर स्टोअर सुरू केले आहे.
जुर्मेश दिलेज येथे हे सुपर स्टोअर सुरू झाले असून गेली 36 वर्षे कष्ट, प्रामाणिकपणा, जिद्द आणि ग्राहकसेवा यांच्या जोरावर ‘अल अदील’ या दातार यांच्या मसाला ब्रॅण्डने दुबईतच नव्हे, तर अवघ्या जगात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. यंदा संयुक्त अरब अमिरातीचेही सुवर्ण महोत्सवी वर्धापन वर्ष साजरे होत असून या टप्प्यावर आमच्याही 50व्या सुपर स्टोअरचे उद्घाटन झाले हा सुखद योगायोग असल्याचे डॉ. दातार म्हणाले. या मराठी मसाल्यामुळेच दातार यांना दुबईत ‘मसालाकिंग’ म्हणून ओळखले जाते.
























































