धनंजय मुंडे यांना ब्रीच कॅण्डीतून डिस्चार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
dhananjay-munde-ncp

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांना 16 दिवसांच्या उपचारानंतर आज ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. पण पुढील काही दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. 3 जानेवारी रोजी मध्यरात्री नंतर धनंजय मुंडे यांच्या मोटारीला परळी येथे अपघात झाला होता. छातीला मार लागल्याने त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

डॉक्टरांनी सक्तीचा विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे पुढील काही दिवस सहकारी-कार्यकर्त्यांनी भेटायला येऊ नये, असे आवाहन मुंडे कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.