
मंत्रिपदाचा राजीनामा देऊन काही महिने झाले नाही तोच धनंजय मुंडे यांना लाल दिव्याच्या आठवणीने बेचैन केले आहे. ‘मी राजकीय बेरोजगार असून मला रिकामं ठेवू नका, माझ्या हाताला काहीतरी काम द्या!’ अशी मागणी त्यांनी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे केली. धनंजय मुंडे यांनी मागणी करताच अजित पवार यांनी लगेच मान डोलावून होकार दिला.
सुनील तटकरे यांचा रायगड जिल्हय़ात नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मुंडे यांनी सुनील तटकरे यांची स्तुती केली. सुनील तटकरे हे कोकणचे विकासपुरुष आहेत. त्यांनी आम्हाला कायम मार्गदर्शन करत राहावे, चुकले तर कान धरावा. पण मला रिकामे ठेवू नका. काही तरी काम द्या, जबाबदारी द्या! असे मुंडे म्हणाले.
बराशी खांदायला जा…मनोज जरांगे यांचा हल्ला
धनंजय मुंडे यांच्या या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांनी कडाडून हल्ला चढवला. धनंजय मुंडे यांच्या हाताला कामच नसेल तर त्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर बराशी खांदण्यासाठी जावे, असा टोला जरांगे यांनी लगावला.
n सध्या विरार ते डहाणूपर्यंतच्या प्रवासात लोकल फेऱ्या आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ा सारख्याच मार्गिकांवरून धावतात. त्यात लोकल ट्रेनची रखडपट्टी होऊन नोकरदारांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर लोकल ट्रेन आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ा स्वतंत्र मार्गिकांवरून धावून लाखो प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.