धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर पदाचा राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांचा पीए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आला. आणि त्याने धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर राज्यातील महायुती सरकारवर आणि दबाव वाढला.