
संतोष भोसले । गेवराई
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शास्त्री चौक गेवराई येथे ३ ऑगस्ट रोजी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने गेवराई तहसिलदार आणि पोलिसांना गुरुवारी निवेदन देण्यात आले आहे. या मध्ये मराठा समाजातील वकील, डॉक्टर, इंजिनिअर, पत्रकार, व्यापारी व सर्व स्तरातील मंडळीचा समावेश आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात मोठ्या प्रमाणात विविध आंदोलने होत असुन त्यात मोर्चे, निदर्शने करण्यात येत आहेत. मात्र शासन याची दखलच घेत नसल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील शास्त्री चौक येथे शुक्रवार पासुन बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. याचे निवेदन देण्यासाठी गुरूवारी सकाळी वकील संघ, डॉक्टर आदी सर्व सकल मराठा समाजातील प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































































