धाराशिवमधील शेतकऱ्यांचे अनोखा प्रयोग, बकरीच्या दुधापासून साबण,

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुष्काळी भाग असलेल्या धाराशिवमध्ये हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला बकऱ्या धावून आल्या आहेत. ऐकायला व वाचायला हे गंमतीशीर वाटतं असलं तरी बकऱ्यांमुळेच येथील शेतकरी पैसे कमावू लागला आहे. येथील 250 गावातील कुटुंबीय बकरीच्या दूधापासून साबण तयार करत असून त्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पनांवर आपला चरितार्थ चालवत असल्याचे समोर आले आहे.

यासाठी स्वयंसेवी संस्था ‘शिवार’ ही शेतकऱ्यांना मदत करत आहे. दुष्काळी भाग असल्याने येथील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. यामुळेच शेतकऱ्यांना उपजीविकेचे मार्ग दाखवण्याचे काम आम्ही करत असल्याचे शिवारचे संस्थापक विनायक हेगाना यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांना तेवढ्यापुरती आर्थिक मदत करण्यापेक्षा ज्याच्यातून त्यांना उत्पन्न मिळेल असे व्यावसाय़िक प्रशिक्षण आम्ही त्यांना देतो. असेही हेगाना यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांना एक लीटर बकरीच्या दूधासाठी 300 रुपये मिळतात. पण एका दिवसाच्या कामाचे 140 रुपये मिळतात. यात 250 कुटुंबीय आणि त्यांच्या 1400 बकऱ्यांचा समावेश आहे.

धाराशिव येथील बकऱ्यांमध्ये व्हिटामीन ए, ई, सेलेमियम, अल्फा हायड्रोक्सी आम्ल असते. जे त्वचेसाठी उपयुक्त आहे. त्वचारोगही बरा होतो. यामुळे या बकऱ्यांच्या दुधापासून मिळणाऱ्या नफ्यामुळे  चिंतामुक्त असल्याचे येथील शेतकऱ्यांनी म्हटले आहे.