Dharashiv Rain काही अडचण आल्यास थेट फोन करा! खासदार ओमराजेंनी दिले संपर्क क्रमांक

धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून धो-धो पाऊस कोसळत आहे. यामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावं पाण्याखाली गेली आहे. पुराचे पाणी शेतीत घुसल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. शुक्रवार रात्रीपासून धाराशिवच्या अनेक भागात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे नद्यांची पाणी पातळी पुन्हा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत.

रात्रीपासून आणखी परंडा व भूम तालुक्यात पाऊस वाढला असून सीना कोळेगाव धरणातून 55 हजार क्युसेस ने पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे नदीकाठच्या व ज्या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे अशा ठिकाणाहून प्रवास करू नये तसेच नागरिकांनी आपल्या जीविताची काळजी स्वतःहून घ्यावी अशी नागरिकांना कळकळीची विनंती, असे आवाहन ओमराजे यांनी कले आहे. तसेच नागरिकांना काही अडचण असल्यास त्यांनी ओमराजे यांच्यासोबत संपर्क साधता यावा यासाठी काही नंबर देखील जारी केले आहेत.

अडचणीत असल्यास या नंबरवर संपर्क साधा –
9960625777
9822352000
8668577701
9665636524
7020870454
9764091699