
हजार रुपयात कोविड लसीचे प्रमाणपत्र विकणाऱ्या एका सायबर कॅफे चालकाला धारावी पोलिसांनी पकडले आहे. त्याने अशा प्रकारे किती जणांना बोगस प्रमाणपत्र विकले तसेच या गोरखधंद्यात त्याला मदत कोण करतोय याचा पोलीस शोध घेत आहेत. धारावीत नाडर नावाचा सायबर कॅफे चालक एक हजारात कोविडची लस घेतल्याचे प्रमाणपत्र विकत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या सायबर कॅफेवर एका ग्राहकाला पाठवला. त्या ग्राहकाने लसीकरण झाल्याच्या प्रमाणपत्राची मागणी केली. तर त्यानुसार नाडरने त्याला लसीचे डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यानंतर पोलिसांनी नाडरला पकडले. याप्रकरणी धारावी पोलीस अधिक तपास करीत आहेत.