केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही कोरोना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
धर्मेंद्र प्रधान (राज्यमंत्री पदावरून कॅबिनेट मंत्रिपदी बढती)

केंदीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. धर्मेंद्र प्रधान यांना उपचारासाठी हरयाणामधील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अमित शहा यांनाही याच रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.

Video – हिंदुस्थानातील पहिला एन 100 मास्क

सोमावारी कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर प्रधान यांनी चाचणी करून घेतली. मंगळवारी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे ट्विट धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल झालो असून आता प्रकृती उत्तम असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आठवडाभरात अनेक मोठय़ा राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यात शिवराजसिंह चौहान, येडीयुरप्पा, तामीळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश आहे.

शिवराजसिंह यांची तिसरी टेस्टही पॉझिटिव्ह
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चैहान यांना कोरोनाची लागण झाल्याने मागील 11 दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळलेली नाहीत, परंतु त्यांची तिसरी चाचणीही पॉझिटिव्ह आल्याने मुख्यमंत्र्यांचा रुग्णालयातील मुक्काम लांबलाय. शिवराजसिंह चैहान कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळल्यानंतर त्यांच्यावर 25 जुलैपासून कोविड सेंटर असलेल्या चिरायु रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी साधना सिंह आणि त्यांची मुले कार्तिकेय आणि कुणाल यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

कर्नाटकचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना कोरोना संसर्ग
कर्नाटकमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताना दिसत आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. कॉँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली असून आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास लगेच आरोग्य तपासणी करावी तसेच होम क्वारंटाइन व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.