
सामना प्रतिनिधी, पारध
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील धामणा धरणाच्या साडव्याला तडे गेले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले ही वार्ता वाऱ्यासारखी गाव परिसरात पसरली. धरणाखाली येणारे पारधसह शेलुद, लेहा, पारध खुर्द गावात भितीचे वातावरण निर्माण झाले.
गावकऱ्यांच्या सुरक्षितेसाठी शेलुद येथे एनडीआरएफ पथक आणि अग्निशमन वाहने, बोट, दंगानियंत्रण पथक आदी व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आले असून शेलुद गावात शुकशुकाट आहे. ग्रामस्था सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. मागील दोन आठवड्यापासून पारधसह परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. आजपर्यंत रायघोळ पाच ते सहा पुर गेले. शेलुद येथील धामणा धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठा आला असून धरणाच्या सांडव्याला तडे गेल्या त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आणि धरण फुटण्याच्या भिंतीने खालील गावात एकच खळबळ निर्माण झाली आहे.
गावागावात दवंडी देऊन नदीच्या काठावरच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे सांगितले आणि प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दोन दिवसांत धरण शंभर टक्के भरले. संभाजीनगरचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी, तहसिलदार, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, भोकरदनचे आमदार यांनी प्रत्येक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परंतु ज्या धारणाखालील लोकांना घरे सोडून जाण्याचे सांगितले. त्यांच्या कडे सहा दिवस झाले तरीही प्रशासनाने लक्ष दिले नाही.
यामुळे शेलुदकरानी काल भर पावसात आपल्या चिमुकल्या मुलांसह धावडा ते पिंपळगाव रेणुकाई रस्त्यावर आंदोलन केले. तब्बल दोन तासांनी भोकरदन तहसीलचे नायब तहसीलदार तांगडे आले. त्या ग्रामस्थाची राहण्याची व्यवस्था सरस्वती विद्यालय, जि.प.शाळा व गजानन महाराज मंदिरात करण्यात आली आहे.





























































