महेंद्रसिंग धोनीचा पत्ता कट! ‘बीसीसीआय’ने वार्षिक करारातून वगळले

7047

‘टीम इंडिया’चा सर्वात यशस्वी कर्णधार… टी-20, वन डे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा एकमेव हिंदुस्थानी कर्णधार… ‘टीम इंडिया’चा संकटमोचक आणि इंग्लंडमधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर मैदानापासून दूर असलेल्या महेंद्रसिंग धोनीचा अखेर पत्ता कट झाला. हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी खेळाडूंशी केलेल्या नव्या करारातून धोनीला वगळल्याने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना आता आणखी खतपाणी मिळाले आहे. ‘बीसीसीआय’ने एकूण 27 क्रिकेटपटूंना करारबद्ध केले असून त्यात 6 नव्या चेहऱयांचाही समावेश आहे.

‘बीसीसीआय’चा नवा करार

  • ‘ए’ प्लस ग्रेड (7 कोटी)- विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह
  • ‘ए’ ग्रेड (5 कोटी)- रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, भुवनेश्कर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, रिषभ पंत
  • ‘बी’ ग्रेड (3 कोटी)- रिद्धीमान साहा, उमेश यादव, यजुवेंद्र चहल, हार्दिक पंडय़ा, मयांक अग्रवाल
  • ‘सी’ ग्रेड (एक कोटी)- केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनीष पांडे, हनुमा विहारी, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर
आपली प्रतिक्रिया द्या