
चौकार-षटकारांची फटकेबाजी करून क्रिकेटचे मैदान गाजवणारा महेंद्रसिंह धोनी आता बॉलीवूडमध्ये बॅटिंग करणार आहे. आगामी चित्रपटामध्ये तो अभिनय करणार आहे. सुरुवातीला तो चित्रपट निर्मिती करणार असल्याचे बोलले जात होते. अभिनेता संजय दत्तसोबत ‘डॉगहाऊस’ चित्रपटात तो झळकणार आहे.
हा चित्रपट गुप्तहेरांच्या कथेवर आधारित असून यात इमरान हाश्मी आणि सुनील शेट्टी यांचाही समावेश असेल, असे समजते. समिर कर्णिक हे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. धोनी हा वर्ल्ड कपच्या सामन्यांनंतर क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे मैदानाऐवजी मोठय़ा पडद्यावर त्याचे दर्शन घडणार ही त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाचीच बाब आहे.





























































