
सामना प्रतिनिधी । वेलिंग्टन
न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टनच्या अखेरच्या वन डे सामन्यात खेळण्यास अनुभवी महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे फिट असल्याचे हिंदुस्थानचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अखेरच्या पाचव्या सामन्यात धोनी मैदानावर खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
धोनी संघात परतल्यामुळे संघातून कोणत्या खेळाडूला डच्चू मिळेल हे उद्याच कळेल. पण क्रिकेटतज्ञांच्या मते दिनेश कार्तिकला संघातून वगळण्यात येऊ शकते. पदार्पणाच्या सामन्यात अवघ्या 9 धावा करणार्या नवख्या शुभमन गिलला आणखी संधी मिळण्याची शक्यता आहे. चौथ्या लढतीत गमावलेली अब्रू परत मिळवण्यासाठी आणि या मालिकेचा विजयी समारोप करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.





























































