धुळ्यात व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या शाळांना सुटी आहे. तरीही शहरात क्रिकेटची बॅट, स्टम्प आणि इतर साहित्य विक्री होत नाही. त्यामुळे क्रिकेट बॅट आणि स्टम्प विकणाNया व्यावसायिकांवर उपवासमारीची वेळ आली आहे. याला कोरोनाचा संसर्ग कारणीभूत आहे.

कोरोनाची भीती वाटत असल्यामुळे पालक शाळकरी मुलांना खुल्या मैदानात खेळण्यासाठी पाठवत नाहीत. मैदानी खेळाचे घरात असलेले साहित्य अडगळीत गेले आहे. तेव्हा नवीन साहित्याची विक्री कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. धुळे शहरातील संतोषी माता चौक आणि इतर भागात परराज्यातील व्यवसायिक स्थिरावले आहेत. देवदार वृक्षाच्या फळ्यांपासून हे कारागिर लहान-मोठ्या आकाराची क्रिकेटची बॅट आणि स्टम्प तयार करतात.

र्वािषक परीक्षा संपली की मुले त्यांच्याकडे क्रिकेटची बॅट आणि स्टम्प खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. नेहमी प्रमाणे यंदाही हे व्यावसायिक फेब्रुवारी महिन्यातच स्थिरावले. परंतु, शाळकरी मुलांची परीक्षा होण्यापूर्वी कोरोना विषाणूचा फैलाव झाला. परिणामी लॉकडाउनच्या फेऱ्यात शाळा आणि शाळकरी मुलेदेखील अडकली. संपूर्ण उन्हाळी सुटी संचारबंदीत गेली. जूनपासून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. या परिस्थितीचा व्यावसायिकांच्या मिळकतीवर परिणाम झाला आहे.