
धुरंधर 2 ची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. ही चर्चा होत असतानाचा एक वाद राकेश बेदी यांच्याभोवती देखील घोंघावत आहे. असाच एक वाद राकेश बेदी यांच्याशी संबंधित होता. गेल्या वर्षी, ‘धुरंधर’च्या ट्रेलर लाँचवेळी राकेश यांनी सारा अर्जुनच्या खांद्यावर चुंबन घेतले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राकेश यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. त्यावेळी, राकेश यांनी या वादावर स्पष्टीकरण दिले होते. त्यांनी या लोकांच्या ट्रोलिंगवर हा त्यांच्या नजरेतील दोष असल्याचे म्हटले होते. यावर अधिक बोलताना ते म्हणाले, सारा मला माझ्या मुलीप्रमाणे आहे.
रेड एफएमच्या एका पॉडकास्टमध्ये राकेश बेदी म्हणाले की, लोकांनी त्यांच्या कृतीचा चुकीचा अर्थ घेतला. ते म्हणतात, “ही एक छोटीशी घटना होती. ‘धुरंधर’मध्ये माझ्या मुलीची भूमिका साकारणारी मुलगी सारा अर्जुन आहे. शूटिंगच्या वेळी जेव्हा कधी ती यायची, तेव्हा मी तिला मिठी मारायचो आणि तिच्या कपाळावर चुंबन घ्यायचो. अगदी माझ्या स्वतःच्या मुलीसारखं. मी साराला म्हणायचो, ‘अगं, काळजी करू नकोस. आपला एक सीन खूप छान होईल.’ पण जेव्हा मी ट्रेलर लाँचच्या वेळी तिचं त्याच प्रकारे स्वागत केलं, तेव्हा लोकांनी माझ्याबद्दल वाईट गोष्टी बोलल्या.” मला आश्चर्य वाटलं कारण मी नेहमीच तिच्याशी तसं वागायचो. सुदैवाने काही लोकांनी माझा बचाव केला. पण खरं सांगायचं तर, लोकांना काहीतरी बोलण्याची संधी हवी असते. तेव्हा लोक आपल्याबद्दल काही ना काही बोलणारच. काहीतरी बोलणं हे त्यांचं कामच आहे.





























































