
सामना ऑनलाईन। मुंबई
पुण्यात आशियाई शरीरसौष्ठव चॅम्पियनशिप झाल्यानंतर आता मुंबईतील अंधेरीत शरीरसौष्ठवाचा मेगा शो पाहायला मिळत आहे. 40 देशांतील एकापेक्षा एक अशा शरीरसौष्ठवपटूंचे पीळदार शरीर यावेळी तमाम क्रीडाप्रेमींना पाहायला मिळणार आहे. इंडियन बॉडीबिल्डिंग ऍण्ड फिटनेस फेडरेशनच्या पुढाकाराने ‘डायमंड कप’ या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या इव्हेंटचा अंतिम संग्राम उद्या होणार असून यामध्ये कोण बाजी मारतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे.
अंधेरीतील महाकाली गुंफा रोड येथील हॉली फॅमिली शाळेच्या पटांगणात ही स्पर्धा होत असून जगभरातील अव्वल खेळाडू या स्पर्धेत सर्वस्व पणाला लावणार आहेत. इंडियन बॉडीबिल्डिंग ऍण्ड फिटनेस फेडरेशनचे सरचिटणीस संजय मोरे यांनी आतापर्यंत या स्पर्धेला लाभलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केलाय.




























































