या देशात अवघ्या दहा ते वीस रुपयात मिळतं पेट्रोल-डिझेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
petrol-dispencer

सध्या पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांनी हिंदुस्थानातील सामान्य नागरिकांच्या नाकीनाऊ आणले आहे. सध्या हिंदुस्थानात डिझेल 70 रुपये प्रती लिटरच्या आसपास मिळत आहे. पेट्रोल तर त्याहून महाग आहे. हिंदुस्थानातील जनता इंधनाच्या दरवाढिमुळे त्रस्त असताना काही असेही देश आहेत जिथे अवघ्या दीड रुपयापासून 20 रुपये प्रती लिटर डिझेलसाठी मोजावे लागत आहे.

इराण – या देशात मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाच्या खाणी आहेत. या देशातून सर्वाधिक डिझेल व पेट्रोल निर्यात केले जाते. या देशात डिझेल अवघ्या 1.63रुपयाला मिळत आहे.

सौदी अरब – जगातील सर्वात मोठी तेल कंपनी सौदी अरामको या देशात आहे. त्यामुळे इथे डिझेलचे दर 8.93 रुपये आहे.

अल्जेरिया  – या देशात डिझेल 13. 79 रुपयांना मिळते. सर्वात स्वस्त डिझेल मिळणाऱ्या देशात अल्जेरिया तिसऱ्या स्थानावर आहे

सूडान  – या देशात देखील तेलाच्या खाणी असल्याने तिथे डिझेल 13.90 रुपयाला मिळते.

इक्वाडोर – इक्वाडोर हा अमेरिकेच्या दक्षिणेला असलेला देश आहे. या देशात डिझेलची किंमत 19.52 रुपये आहे.

अंगोला – अंगोला देशात कच्चे तेल, सोनं आणि खनिजांचं भंडार आहे. त्यामुळे या देशात डिझेल 19.95 रुपयांना मिळतं.