ट्रेंड -दुस्तर हा घाट

घाटातून प्रवास करण्याचा अनुभव आपण कधी ना कधी घेतलेला असतो. घाट लागला की गाडीचा वेग कमी होतो, ड्रायव्हर सावध होतो, प्रवासीही आधार घेतात. कारण, अपघाताची भीती… आपल्याकडं रस्ता रुंदीकरणामुळे हल्ली ही भीती कमी झालेली दिसते. पण हिमालयातील राज्ये यास अपवाद आहेत.

या ठिकाणी अजूनही दुस्तर घाटांतूनच प्रवास करावा लागतो. भीती काय असते ती रस्त्यांवरून प्रवास केल्याशिवाय कळणार नाही. प्रत्यक्ष प्रवास करण्याची संधी तुम्हाला मिळेल न मिळेल, पण सध्या सोशल मीडियात ट्रेंडमध्ये असलेला एक व्हिडिओ पाहून तुम्हाला थरारक अनुभव नक्कीच घेता येईल. एक बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला सरळसोट उंच कडा… यात कोरलेल्या निमुळत्या अरुंद आणि खडी भरल्या रस्त्यातून जाणारी एक बस व्हिडिओत दिसते. ती पाहिल्यावर असला प्रवास करावा लागू नये असंच तुम्ही म्हणाल. https://tinyurl.com/5n8wh3h8 या लिंकवर हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.